कोल्हापूर: विटभट्टी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून खेबवडे (ता. करवीर) येथील तरुणाला बोलवून घेत अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. सागर सुरेश गायकवाड (वय ३०) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. बेनिंग्रेच्या सहा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केल्याचे जखमी सागरने कागल पोलीसांना सांगितले. संशयित सागर व इतर पाच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सागर गायकवाड हा शेती करतो. खेबवडे गावात त्याचा विटभट्टी व्यवसाय आहे. रविवारी दूपारी तो शेतात पाणी पाजत होता. यावेळी त्याचे मोबाईलवर सागर नावाच्या व्यक्तिचा फोन आला. तुम्हाला मी ओळखतो, महत्वाचे काम आहे, तुम्ही कागलमध्ये येवून भेटा असा निरोप आल्याने सागर मेव्हणा विरकुमार भिकाजी पाटील यांची दूचाकी घेवून गेला. कागल नाका येथील एका हॉटेलच्या दारात आलेनंतर संशयित याठिकाणी दूचाकीवरुन थांबून होते. त्यांनी सागर गायकवाड याला तुमच्या विटभट्टीवरील कामगार कुठे आहेत. त्याने साहित्य ठेवून बाजार आनण्यासाठी ते कागलला गेले असल्याचे सांगितले.
आमचे कामगार तू का घेतले म्हणून शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. तेथून त्याला दूचाकीवरुन व्हन्नुर माळावर, यळगुड, निपाणी आदी ठिकाणी नेवून काठीने बेदम मारहाण केली. मध्यरात्री दोनपर्यंत त्याला फिरवीत होते. कर्नाटक सीमा भागात लघुशंकेला आले म्हणून सागरने संशयितांच्या हातातून सुटका करीत ऊसातून पळ काढला. चालत तो निपाणी येथील बहिणीच्या घरी आला. तेथून भाऊ प्रतापला फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर सोमवारी पहाटे त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मारहाण इतकी जोरात केली आहे की, सागरच्या अंगावरील कातडे निघून गंभीर जखमा झाल्या आहेत.