शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

चित्रकारांच्या कुंचल्यातून कोकणचे सौंदर्य!

By admin | Published: December 14, 2015 11:53 PM

‘कोकण कट्टा’चा उपक्रम : चित्रकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच कोकणच्या पर्यटन विकासाचा हेतू

चिपळूण : कोकणातील अभिजात सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडते. कोेकणचे हे सौंदर्य पाहण्यासाठी देश- विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने यावेत व त्यातून कोकणचा पर्यटन विकास साधला जावा. यासाठी कोकणचे हे सौदर्यं व्यावसायिक चित्रकार, कलावंताच्या कुंचल्यातून रेखाटून ते मोठ्या शहरातील प्रदर्शनांमध्ये मांडून पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करणे व कलावंताना मोठे व्यासपीठ मिळवून देणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून पेढे परशुराम परिसरात व परशुराम घाटात राज्यभरातील नामवंत व्यावसायिक चित्रकारांनी या परिसरातील विविध ठिकाणची निसर्गचित्रे काढली. परशुराम घाट व परिसरात चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.गुहागरमधील पालशेत गावचे सुपूत्र अजित पितळे यांनी सोळा वर्षापूर्वी कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन मुंबईत विलेपार्ले येथे ‘कोकण कट्टा’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा १६ वा वर्धापन दिन असल्याने त्याचे औचित्य साधून संस्थेने कोकणातील विविध निसर्गस्थळांचा कुंचल्यातून अविष्कार घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यासाठी मुंबईतील नामवंत व्यावसायिक चित्रकार जितेंद्र गायकवाड, तुषार कदम यांच्या मदतीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. संस्थेचे कोकणातील समन्वयक सुमंत भिडे (मळण - गुहागर) व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांनी कोकणातील निसर्गचित्र रेखाटनासाठी चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम परिसराची निवड केली. परशुराम घाटातून दिसणारे चिपळूण शहराचे विहंगम दृश्य, वाशिष्टी नदी व परिसर, परशुराम मंदिर व त्याचा परिसर आदी विविध ठिकाणची सुमारे पंचवीस चित्रे रेखाटण्यात आली. या उपक्रमाची सुरूवात परशुराम येथे अभय सहस्त्रबुध्दे यांच्या निवासस्थानी करण्यात आली. कलावंतांच्या हस्तकौशल्यातून साकारणारी चित्रे पाहताना चिपळूणकरांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बोरकर, जिल्हा परिषद सदस्य विश्वास सुर्वे, संस्थेचे अध्यक्ष अजित पितळे, सुमंत भिडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात राज्यभरातील सुमारे २२ नामवंत व्यावसायिक चित्रकार सहभागी झाले होते.परशुराम - पेढे परिसरातील हा निसर्गचित्र रेखाटन उपक्रम दिवसभर सुरु होता. या रेखाटन उपक्रमाचा समारोप पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. यावेळी मान्यवर व चित्रकार उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. मंदार आठवले, डॉ. बाळासाहेब ढेरे, अभय सहस्त्रबुध्दे यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)विविध ठिकाणी उपक्रम : आरे - वारे येथील ग्रामस्थांची मागणीकोकणातील हे अभिजात सौंदर्य कुंचल्यातून कागदावर उतरवून त्याची मोठमोठ्या शहरांतून प्रदर्शने भरवली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटन विकास तसेच कलाकारांनाही संधी व व्यासपीठ मिळणार आहे. यापुढे कोकणातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे - वारे या गावातूनही ग्रामस्थांनी अशा उपक्रमाची मागणी केली आहे. सिंंधुदुर्गपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे, असे सांगितले.- अजित पितळे, अध्यक्ष, कोकण कट्टा संस्थेतर्फे सिंधुदुर्गातही उपक्रम राबविणार.गुहागर - पालशेत येथील अजित पितळे यांची संकल्पना.कोकणचे निसर्गसौंदर्य दूरवर पोहचवण्याचा ध्यास.डोळ्यांचे पारणे फिटले‘कोकण कट्टा’च्या उपक्रमात मुंबईतील नामवंत कलाकारांनी आपल्या हस्तकौशल्यातून कोकणचे सौंदर्य कागदावर रेखाटले होते. ही चित्रे पाहून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फिटले. कलावंतांनी रेखाटलेल्या या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.