शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:01 AM

गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने

कृष्णा सावंत ।आजरा : गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्प तुडुंब भरला आहे. चहूबाजूने असलेला डोंगर, धरणाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटलेली असल्याने चालूवर्षी प्रकल्पाचे सौंदर्य भलतेच खुलले आहे. प्रकल्पापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत ३०० हेक्टरमध्ये पाणी साठल्याने प्रकल्पाला समुद्राचे स्वरूप आले आहे.

प्रकल्पाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटली आहे. भात रोपांचे मोठे वाफे हिरवाईने प्रकल्पावरून पाहताना मनमोहरून जाते. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे पर्यटक अल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. यावर्षीच्या फुललेल्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, मुंबई, गोवा, पुणे येथील पर्यटक प्रकल्पाचा आस्वाद घेत आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी आणि शंभर टक्के पुनर्वसनासाठी आवंडी, रायवाडा आणि गावठाणवाडी (आताचा चित्रानगर) येथील धरणग्रस्तांनी १९९२ पासून सन २००० पर्यंत संघर्ष केला. त्यामुळे चित्रीच्या सौंदर्याच्या समृद्धीबरोबरच पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार फुलला.

कर्नाटकातील संकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळाले. त्यामुळे चित्री धरणग्रस्तांच्या त्यागामुळे चित्रीचे सौंदर्य नटलेच, सोबत अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली.तालुक्यातील पाच हजार हेक्टर बहरलेचित्री प्रकल्पाचा आजरा तालुक्याला कमी लाभ झाला; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील पाच हजार हेक्टर शेती ओलिताखाली येऊन सर्वसामान्य शेतकºयांचे जीवन फुलले. आजरा, गडहिंग्लज आणि कर्नाटकातील शेतकºयांचे जीवनमान २२५ धरणग्रस्तांच्या त्यागामुळे खºया अर्थाने फुलले.इटे ते प्रकल्पापर्यंत रस्त्याची गरजइटे फाटा ते चित्री प्रकल्पापर्यंत चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसह पर्यटकांनाही यात्रा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होण्याची गरज व्यक्त होत आहे.रोजगार निर्मितीला संधीप्रकल्पामुळे चित्रीचे सौंदर्य व अनेकांचे जीवनमानही नटले आहे. चित्रीवर येणाºया पर्यटकांची संख्या पाहता रोजगार निर्मितीला संधी आहे. या ठिकाणी हॉटेल, विश्रामगृह, चहा-नाष्टा सेंटर, आदी व्यवसायांना चालना मिळू शकते.