ताराराणी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून तसेच ताराराणी महिला सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त वळीवडे (तालुका करवीर) येथे ताराराणी महिलांनी सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार केला. सफाई कर्मचारी महिला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्या गावातील गल्लीबोळातील गटारींची व रस्त्यांची स्वच्छता करतात. हे काम फारच कौतुकास्पद आहे तसेच महिला अन्य क्षेत्रांत चांगले काम करू शकतात व त्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. त्या कोणत्याही कामात मागे पडत नाहीत. महिलांना कुठलीही जबाबदारी द्या, त्या प्रामाणिकपणे पार पाडू शकतात, असे ताराराणी महिला सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुलोचना नार्वेकर यांनी भावना व्यक्त केल्या. या सफाई कर्मचारी महिलांचा पुष्पगुच्छ व साड्या देऊन सत्कार व कौतुक करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता गवळी यांनी केले. आभार साक्षात अतिग्रे यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्थित महिला तेयसीम नदाफ, कविता पवार, लक्ष्मीबाई कुंभार, सरिता सुतार, उमा खांडेकर ,ज्योती पवार, सुरेखा शिंदे, अर्चना कांबळे, आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
फोटो ओळ:-ताराराणी महिला सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सफाई कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुलोचना नार्वेकर व महिला उपस्थित होत्या.