कोकणात प्रतिवर्षी मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात येतात. सात, अकरा, एकवीस दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. आजरेकर यांनी केलेल्या आकर्षक व रेखीव गणेश मूर्तींना प्रत्येक वर्षी मागणी असते. आजरेकर कुंभार बांधव ज्या त्या गावात जाऊन स्वतंत्र घर भाड्याने घेऊन त्याच ठिकाणी मुक्काम करतात व गणेशमूर्ती तयार करीत असतात. चालू वर्षीही गणेशमूर्ती तयार करणारे कुंभार बांधव दाखल झाले आहेत.
चौकट : आजऱ्यातील गणेशमूर्तींना साताऱ्यातूनही मागणी
आजऱ्यातील गणेशमूर्ती कारागीर आनंदा कुंभार यांनी मातीच्या व शाडूच्या एक फूट उंचीच्या दोन हजार मूर्ती तयार करून साताऱ्याला पाठविल्या आहेत. गेल्या वर्षी साताऱ्यातून आजऱ्याच्या गणेशमूर्तींना मागणी होती, त्यानुसार तयार केलेल्या गणेशमूर्ती साताऱ्याला पाठविल्या आहेत.
फोटो ओळी - आजऱ्यातील कुंभार बांधवांनी कोकणात तयार केलेल्या शाडू व मातीच्या गणेशमूर्ती. (श्रीहरी येळेकर) क्रमांक : २२०७२०२१-गड-०१