शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 6:12 PM

एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्याबेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा

बेळगाव  : एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगावपोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे.भांदुरगल्ली येथील व्यक्ती मागील चार महिन्यापासून बेपत्ता होता. याबद्दल तपास करताना या व्यक्तीचे काही जणांनी अपहरण केले असल्याचे मार्केट पोलिसांच्या लक्षात आले होते. यामुळे सापळा रचुन संशयितांना जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आले आहे.भांदुर गल्ली येथील अण्णासाहेब चौगुले यांना कीडनॅप करून कोट्यवधी रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाद्वार रोड येथील विनायक शंकर प्रधान,न्यु गांधीनगरचा पिंटू उर्फ शिवनाथ रानबा रेडकर,फुलबाग गल्लीतील अमित यल्लप्पा मजगावी, गांधीनगरचा मुरारी बाबजन खानापुरी, हडलगे गावचा सुरेश महादेव पाटील, बेळवट्टीचा चेतन नारायण पाटील, अनगोळचा संजय प्रकाश कौजलगी,राजू ज्ञानेश्वर गोणी, अमित परशराम धमाणेकर यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या जवळून किडनॅप करण्यासाठी वारपलेली एक कार पाच दुचाकी व ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मार्केट ए सी पी एन व्ही बरमनी व पोलीस निरीक्षक संगमेश् शिवयोगी यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.बेळगाव भांदूर गल्लीचे रहिवाशी अण्णासाहेब चौगुले हे ब्रह्मचारी आहेत त्यांच्या नावे सांबरा रोडवरील पोतदार शाळेजवळ २ एकर ३४ गुंठे अशी कोट्यवधी रुपयांची जमीन आहे या शिवाय अण्णासाहेब यांच्या नावावर ३० लाखांचे डिपॉझिट आहे.

चार महिन्यापूर्वी अण्णासाहेब बेपत्ता असल्याची तक्रार मार्केट दाखल झालो होती, त्यावेळीच या अपहरणकर्त्या टोळीने त्यांचे अपहरण करून जिल्ह्यातील वेगवेगळ्या फार्म हाऊस मध्ये ठेवले होते.

शेवटी महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे येथे ठेवले होते. जीवाची भीती दाखवून त्यांच्या कडून लिहून घेतली होती. रजिस्टर ऑफिसला जाण्याअगोदर लॉक डाऊन सुरू होते, त्यामुळे आरोपींचे मनसुबे उधळले. लॉक डाऊन संपताच आणासाहेब बँकेमधील पैसे काढण्यासाठी बेळगावला आणल्यानंतर पोलिसांनी अपरहरणकर्त्यांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले यांना अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत होते. त्याच्याकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे पैश्याची मागणी करण्यात येत होती.

पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार आणि डीसीपी यशोदा यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सापळा रचला होता.लॉकडाऊनच्या काळात अपहरण करून एक व्यक्तीच्या जीवाची भीती घालून पैसे उकळण्याचा कारभार त्या ९ जणांना अंगलट आला आहे. आता त्यांना कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस