१) तुझ्याच रंगात न्हहातो...
कोल्हापुरात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या बैलांची मनोभावी पूजा करण्यात आली. पंचगंगा नदी घाटावर बैलांची सजावट करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अक्षरश: स्पर्धा लागली होती. चिमुकला आपल्या बैलाच्या अंगावर विविध रंग टाकून त्याला अधिक आकर्षित करण्यात मग्न होता. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर) (छाया- आदित्य वेल्हाळ)
२) बैलांच्या शिंगांबरोबरच त्याच्या अंगावरही विविध रंग दिले होते. वाघासारखे रंगवलेल्या बैल पंचगंगा पदी घाटावर आकर्षण होते. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी युवकांची गर्दी झाली होती. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०१) (छाया- आदित्य वेल्हाळ)
३) बैलांची चित्तथरारक प्रात्यक्षिकेही यावेळी पाहवयास मिळाली. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०२) (छाया- आदित्य वेल्हाळ)
४) बैलाची रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतर त्याला मायेने कुरवाळून चिमुकल्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०३) (छाया- आदित्य वेल्हाळ)
५) कोल्हापुरात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्याचेही पडसाद बैलांच्या रंगरंगोटीत उमटले. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०४) (छाया- आदित्य वेल्हाळ)
६) पंचगंगा नदीघाटावर आकर्षक बैल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. (फोटो-२५०६२०२१-कोल-बेंदूर०५) (छाया- आदित्य वेल्हाळ)