कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या सिंचनाच्या सोयी व पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस शेतीकडे वळला आहे. उसाच्या लागवडीने जनावरांना मुबलक वैरण यामुळे दुधाचे अर्थकारण व ऊस शेतीतून मिळणारा पैसा यामुळे शेतकरी ऊस शेतीकडे आर्थिक दृष्टिकोनातूनच पाहतो. मात्र, ही शेतीही अधिक फायद्याची व कमी श्रमाची करावयाची झाल्यास शेतकऱ्यांनी नेहमी शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवला, तरच त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. यासाठीच ऊसाची रोपे तयार करून त्याची लागण करण्यात फायदे आहेतच; पण वेळेची व श्रमाची बचतही करता येते.शेतावरच ऊस रोपे तयार करण्यासाठी प्लास्टिक ट्रेचा वापर करताना पाणथळ व वाळवीचा प्रादुर्भाव असलेली जागा निवडू नये. वर्षभर पाण्याची सोय असावी. ऊन, वारा व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी जागेवर शेडनेट गृहात २ बाय १.५ फुटाचे ४२ कंपाचे प्लास्टिक ट्रे वापरल्यास ४५ दिवसांत दहा हजार रोपे तयार करता येतात. बेणे मळ्यातील ९ ते ११ महिन्यांचे सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्याचे निरोगी बेणे वापरावे. बेणे तोडल्यापासून शक्यतो २४ तासांच्या आत त्याची लागवड करावी.रोपनिर्मिती प्रक्रिया : प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडी योग्य होतात. त्यासाठी ऊस लागणी अगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत. मळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे, एक डोळ्याचे भाग करावेत. एक डोळ्याचे पेर पाच ते दहा मिनिटे ०.१ टक्का कार्बेन्डाझिमच्या (१० लिटर पाण्यात १० गॅ्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत. बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणू संवर्धनाची बेणे प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात एक किलो अॅसिटोबॅक्टर + एक किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक (पी. एस. बी.) + १.५ ते २ किलो शेण मिसळून त्यात ३० मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावेत.२५ किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट + एक किलो युरिया चांगले मिसळून ते प्लास्टिक ट्रेमध्ये फॉस्फेट + एक किलो युरिया चांगले मिसळून ते प्लास्टिक ट्रेमध्ये कपात एक तृतियांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.ऊस लावण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे. रोपांना दोन-तीन पाने आल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.- प्रकाश पाटील ल्ल कोपार्डेसाखर कारखाने एक महिना अगोदरची नोंद लागण केल्यावर घेतात.कमी उसात दर्जेदार व शाश्वत रोपे मिळाल्याने आर्थिक फायद्याबरोबर श्रमही वाचतात.
ऊस रोपे तयार करणे फायद्याचे
By admin | Published: January 06, 2015 12:34 AM