- राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने दूध व पावडर निर्यातीवर अनुदानाची घोेषणा केली असली तरी या निर्णयाचा उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा दूध संघांनाच फायदा होणार आहे. त्यातही पावडर व टेट्रा पॅक दूध प्रकल्प असणाºया संघांनाच याचा लाभ अधिक होणार आहे. खासगी संघांनी १७ रुपये लीटरने दूध खरेदी करून त्याची पावडर केली आणि आता ५० रुपये अनुदान घेऊन विक्री करणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा शेतकºयांना होणार नसल्याने उत्पादकांची ससेहोलपट कायम राहणार आहे.गाईच्या अतिरिक्त दुधाचे संकट कमी करण्यासाठी राज्य सरकारने पावडर व दूध निर्यात अनुदान देण्याची अधिकृत घोषणा विधिमंडळात केली.सरकारने जाहीर केलेले अनुदान हे फसवे असून त्याचा फायदा राज्यातील दोन-तीन बड्या संघांनाच होणार आहे. मोठा निर्णय घेतल्याचा कांगावा करणाºयांनी उद्यापासून दूध संघ शेतकºयांना दरवाढ देणार का? याची ग्वाही द्यावी. पावडर निर्यातीला दोन महिन्यांत ५३ कोटींचे अनुदान खर्ची पडले, त्याचा फायदा होण्याऐवजी दोन रुपये दर कमीच झाले, हा निर्णय शेतकºयांपेक्षा काही ठरावीक संघांसाठीच घेतला आहे. - खासदार राजू शेट्टीसरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. माणूस बेशुद्ध पडल्यानंतर औषध देऊन काही उपयोग होत नाही. या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही.- अरुण नरके, अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन
दूध व पावडर निर्यात अनुदानाचा फायदा उत्पादकांपेक्षा संघांनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:16 AM