एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककेरळ, पश्चिम बंगाल येथून झटपट पैसा मिळविण्यासाठी चांगली नोकरी देतो, असे सांगून तरुणींना प्रथम मुंबईमध्ये व तेथून देहविक्रीसाठी थेट कोल्हापुरात आणले जाते. गेल्या सात वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेले हे सेक्स रॅकेट मुंबईतील सलीम व पुण्यातील गणेश हे दोघे एजंट चालवित आहेत. त्यांनी राज्यभर एजंटांचे जाळे विणले आहे. या दोघांवर मुंबई-पुणे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र कोल्हापूर पोलिसांना या दोघांचा मागमूसही लागलेला नाही.बहुतांश हॉटेल, लॉजमध्ये अशाप्रकारे वेश्याव्यवसाय चालविला जातो. ‘एंट्री’च्या नावाखाली अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा व्यवसाय बहरला आहे. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बहरलेल्या अनैतिक व्यापाराला चाप लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात गोपनीय विभागासह गुन्हे शाखेचा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यांना आपल्या हद्दीमध्ये विविध हॉटेल, लॉज, फ्लॅटवर राजरोस सुरू असलेला हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसाय कसा दिसत नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.शहरातील महाद्वार रोड, ताराबाई पार्क, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, आर. के. नगर, फुलेवाडी रिंंग रोड, शिरोली, कागल हायवे, न्यू शाहूपुरी, आदी ठिकाणी छुप्या मार्गाने आजही सेक्स रॅकेट चालविले जात आहे. याची माहिती पोलिसांना आहे; परंतु हप्त्याच्या आमिषाखाली ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत.व्हॉट्स अॅपचा वापरपुणे-बंगलोर महामार्गावर निपाणी टोलनाका ते किणी टोलनाक्यापर्यंत रस्त्याकडेला असणाºया हॉटेल-लॉजवर दिवस-रात्र वेश्या व्यवसाय सुरू आहे. सांकेतिक भाषेमध्ये ते गिºहाइकाला तरुणी पुरवीत असतात. दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दर दिला जातो. एजंट व्हॉट्स अॅपवर संबंधित तरुणींचे फोटो पाठवितात. त्यानंतर गिºहाइकाशी फोनवर दर ठरविला जातो. रिक्षा किंवा कारमधून तरुणीला संबंधित लॉजवर पाठविले जाते.
कोल्हापूर सेक्स रॅकेटचे बंगाली कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:21 AM