राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यासाठी आतापर्यंत विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊ, अशी ग्वाही मंत्री यड्रावकर यांनी दिली. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून यावर्षी तालुक्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची विकासकामे सुरू आहेत. येथून पुढेही निधीची कमतरता भासणार नाही.
यावेळी सरपंच गोरख चव्हाण, सुहास तिवडे, रवींद्र तिवडे, अतुल हेगडे, भिकू कांबळे, अतुल कांबळे, प्रभाकर चौगुले, संतोष पाटील, विद्याधर कर्वे, नितीन कोनिरे, रमेश चौगुले उपस्थित होते.
फोटो - १४०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - उमळवाड (ता. शिरोळ) येथे समाजमंदिर बांधकामाचा प्रारंभ राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.