कोल्हापूर : कोल्हापूर शहर विद्यार्थी कॉंग्रेस च्यावतीने बेस्ट फ्रॉम वेस्ट या संकल्पनेअंतर्गत इको फ्रेंडली बर्ड फिडर तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात १०० फिडर तयार करण्यात आले असून ते सार्वजनिक ठिकाणी वितरित करण्यात आले तर काही झाडावर बसविण्यात आले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा एनएसयूआयचे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. बर्ड फिडरसाठी घरातीलच वेस्ट प्लास्टिक मटेरियलचा वापर करण्यात आला. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लेट व दोरा इतके साहित्य फिडरसाठी वापरण्यात आले. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी व आपल्या खाद्यासाठी करावी लागणारी वणवण थांबविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे अनावरण झाले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक थोरात, विनायक पाटील, उदय पोवार, अभिषेक मिठारी, सुशांत चव्हाण, मुबिन मुश्रीफ, साईराज पाटील, सत्यजित शेजवळ, संदेश बागल, श्लोक चिंचवडे, अभिषेक माने उपस्थित होते.