शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:54 AM

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व ...

ठळक मुद्देइचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा, जनता मतपेटीतून परिवर्तन घडवेल

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते.

यावेळी राजू शेट्टी यांनी सर्व गट-तट विसरून भाजपच्या विरोधात राज्यात प्रथमच इचलकरंजीत मोर्चा निघाल्याबद्दल सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही; म्हणून कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. याउलट जनतेला मात्र अन्नधान्य, खाद्यतेल महागाईच्या भावानेच मिळत आहेत. उद्योगधंदे बंद पडताहेत, कामगार बेरोजगार आणि शेतकरी तोट्यात अशी स्थिती भाजप सरकारच्या चार वर्षांतील आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, भाजपने निवडणुकीवेळी लोकांना स्वप्न दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाच्या बॅँक खात्यात१५ लाख रुपये आले नाहीत; उलट गोरगरिबांचे रेशनिंगचे धान्य गायब झाले. वस्त्रोद्योगाची स्थिती बिकट झाली. यंत्रमागाची विक्री भंगाराच्या भावात सुरू आहे. उद्योगधंदे-शेतकरी-कामगार देशोधडीला लागले तरी सरकार ढिम्म आहे. त्यामुळे जनतेने आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवावी.

मोर्चासमोर बोलताना जनता दलाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांनी भाजप सरकार सामान्य जनतेच्या खिशाची लूट करून बड्या उद्योगपतींची भर करीत असल्याचा आरोप केला. यावेळी दत्ता माने (माकप), मिश्रीलाल जाजू (राष्टÑवादी कामगार संघटना), मदन कारंडे (राष्टÑवादी कॉँग्रेस), महादेव गौड (शिवसेना), राजेंद्र निकम (मनसे), आदींनीही वाढत्या महागाईचा निषेध करीत सरकारवर टीका केली. त्यानंतर मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.आता सुट्टी नाही : शेट्टीपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खासदार शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील तुमच्या सरकारने घोर निराशा केली आहे. तुम्ही पाताळात जरी दडलात, तरी तुम्हाला हुडकून काढून जनता बदला घेईल. आता तुम्हाला सुट्टी नाही.सवाल-जवाबचे आव्हानइचलकरंजीच्या जनतेला पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप करीत माजी मंत्री आवाडे यांनी जनतेच्या समस्या व निवडणूक काळातील आश्वासनांबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकाच व्यासपीठावर येऊन सवाल-जवाब करण्याचे आव्हान दिले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर