कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या दीड महिन्यात दोन वेळा मधमाश्यांचे मोठे पोळे अचानक उठण्याचा प्रकार घडला. त्यातील मधमाश्या चावल्याने सकाळी फिरायला येणारे नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठात फिरायला जाताना मधमाश्यांपासून नागरिकांनी सावध राहावे. त्यांनी विद्यापीठाच्या नियमांचे पालन करावे.
जैवविविधतेने नटलेल्या विद्यापीठाच्या परिसरात सध्या मधमाश्यांची आठ ते दहा पोळी आहेत. या परिसरातील फुलांच्या परागीभवनाच्या प्रक्रियेत या मधमाश्या महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांची पोळी मुख्य इमारत आणि त्यासमोरील बगिचाच्या दोन्ही बाजूंना असलेली अधिकतर उंचीची झाडे, तंत्रज्ञान अधिविभागाच्या इमारतीवर दिसून येतात. ‘नॅक’च्या पार्श्वभूमीवर इमारतींवरील पोळी हटविण्यात आली आहेत. मात्र, झाडांवरील पोळी कायम आहेत. घार किंवा अन्य पक्ष्यांमुळे, जोरात वारे आले आदी कारणांमुळे ही पोळी उठतात. गेल्या दीड महिन्यात दोन वेळा सकाळच्या वेळेत मोठी पोळी उठली. त्यातील मधमाश्या काही नागरिक आणि विद्यापीठातील सुरक्षारक्षकांना चावल्याने ते जखमी झाले. असे अचानक पोळे उठल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे.
पॉइंटर
नागरिकांनी घ्यावी अशी काळजी
१) मधमाश्यांचे पोळे उठल्यानंतर घाबरून जाऊ नये.
२) वेगाने हालचाल करू नये.
३) पोळे असलेल्या ठिकाणाहून जाणे शक्यतो टाळावे.
४) विद्यापीठात वाहन चालविण्याच्या गतीची मर्यादा पाळावी.
प्रतिक्रिया
विद्यापीठात सोमवारी सकाळी अचानकपणे पोळे उठले आणि त्यातील मधमाश्या माझ्यासह अन्य काही नागरिकांना चावल्या. सकाळच्या वेळी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार सुरू असते. पोळे उठल्यानंतर तेथूनच बाहेर जावे लागते. अशा वेळी एनसीसी भवन, मानव्यशास्त्र इमारत आदी परिसरांतील प्रवेशद्वारे खुली ठेवावीत. त्या दृष्टीने विद्यापीठाने उपाययोजना करावी. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी.
- राहुल सप्रे, सेवानिवृत्त प्राध्यापक.
प्रतिक्रिया
मधमाश्यांचे पोळे असलेली ठिकाणे, परिसरातून आणि रस्ता नसलेल्या परिसरात शक्यतो नागरिकांनी फिरू नये. पोळे उठल्यानंतर त्यांनी घाबरून जाऊ नये. हातवारे करणे टाळावे. जेथे आहे त्या ठिकाणी थांबावे. रस्त्यावरूनच फिरावे.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
फोटो (२४०३२०२१-कोल-विद्यापीठ मधमाश्या, ०१, ०२, ०३, ०४) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या उंच झाडांवर सध्या मधमाश्यांची मोठी पोळी आहेत.
===Photopath===
240321\24kol_2_24032021_5.jpg~240321\24kol_3_24032021_5.jpg~240321\24kol_4_24032021_5.jpg
===Caption===
फोटो (२४०३२०२१-कोल-विद्यापीठ मधमाश्या, ०१, ०२, ०३, ०४) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या उंच झाडांवर सध्या मधमाश्यांची मोठी पोळी आहेत.~फोटो (२४०३२०२१-कोल-विद्यापीठ मधमाश्या, ०१, ०२, ०३, ०४) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या उंच झाडांवर सध्या मधमाश्यांची मोठी पोळी आहेत.~फोटो (२४०३२०२१-कोल-विद्यापीठ मधमाश्या, ०१, ०२, ०३, ०४) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात असलेल्या उंच झाडांवर सध्या मधमाश्यांची मोठी पोळी आहेत.