शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

झाडे तोडणाऱ्यांनो सावधान; एका झाडाची किंमत तब्बल ७४ लाख ५० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 8:25 AM

environment News : शंभर वर्षाच्या जुन्या झाडांची पर्यावरणीय किंमत एक कोटी रुपयांहून अधिक निश्चित केली आहे. एका  छोट्या झाडाच्या बदल्यात १०,  मध्यम आकाराच्या झाडांच्या बदल्यात २५ तर मोठ्या आकाराच्या झाडांच्या बदल्यात ५० रोपे जगवण्याची जबाबदारी द्यावेत

- संदीप आडनाईक कोल्हापूर  -  एका झाडाची पर्यावरणीय किंमत ७४ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या एका तज्ञ समितीने निश्चित केले आहे. झाडांचे मूल्य ठरवण्यासाठी देशात प्रथमच अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे येत्या काळात उठसूट झाडं तोडण्याला चाप बसणार आहे.शंभर वर्षाच्या जुन्या झाडांची पर्यावरणीय किंमत एक कोटी रुपयांहून अधिक निश्चित केली आहे. एका  छोट्या झाडाच्या बदल्यात १०,  मध्यम आकाराच्या झाडांच्या बदल्यात २५ तर मोठ्या आकाराच्या झाडांच्या बदल्यात ५० रोपे जगवण्याची जबाबदारी द्यावेत असा निर्णय समितीने दिला आहे. एखाद्या प्रकल्पासाठी जर शंभराहून अधिक झाडे तोडली जाणार असतील तर आता त्यांना एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावावी लागणार आहेत.गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर झालेला हा अहवाल जनसामान्यांसाठी बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.पश्चिम बंगालमधील रेल्वेचे पाच उड्डाणपूल बांधण्यासाठी ३५६ झाडे तोडण्यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने झाडांची किंमत निश्चित करण्यासाठी या तज्ञ समितीला अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही विकास प्रकल्पासाठी जर झाडे तोडायची असतील तर त्यांची किंमत ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित असावीत यासाठी गतवर्षी जानेवारी महिन्यात या समितीला अहवाल तयार करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या.सदस्यांनी या अहवालात एखादे झाड निसर्गाला तो देत असलेला प्राणवायू व इतर लाभ याचे आर्थिक मूल्य विचारात घेतले आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवण्यात आला होता.टायगर एन्व्हायरमेंट सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक निशिकांत मुखर्जी,  टायगर सेंटर फॉर सायन्स अँन्ड एन्व्हायरमेंटचे व्यवस्थापकीय संचालक  व सचिव व सचिव सोहम पंड्या, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे संचालक  सुनीता नारायण, पश्चिम बंगालच्या आरओबीचे युनिटचे मुख्य सहाय्यक अभियंता बिलवेशकुमार माझी आणि नोर्थ २४ परगण्याचे विभागीय वन अधिकारी निरंजीता मित्रा या पाच जणांच्या तज्ञ सदस्यांच्या समितीने हा अहवाल दिला आहे.

तोडातोडीच्या वृत्तीवर कुऱ्हाड अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आल्यामुळे येत्या काळात उठसूट झाडं तोडण्याला चाप बसणार आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणforestजंगल