येळावी (सांगली) : बांबवडे (ता. पलूस) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात किरण भगत (मोही) याने सेना दलाच्या सोनू (दिल्ली) यास केवळ तेराव्या मिनिटाला एकचाक डावावर अस्मान दाखविले. या कुस्तीसाठी दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.बांववडेच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीकडे उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले होते. किरण भगत आणि सोनू यांची सुरुवातीपासूनच खडाखडी सुरू होती. दोघांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्यात पहिली दहा मिनिटे घालवली. अखेर किरणने तेराव्या मिनिटाला सोनूला आकडी लावून कुस्ती जिंकली.द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेस (कोल्हापूर) येथील वस्ताद विश्वास हारूगडे यांचा पठ्ठा माऊली जमदाडेने शाहूपुरी तालीमीचे वस्ताद अशोक नागराळे यांचा पठ्ठा हसन पटेलवर अवघ्या दुसऱ्या मिनिटात बाहेरून आकडी डावावर विजय मिळवला. विजयी माऊली जमदाडे यास एक लाखाचे बक्षीस देण्यात आले.तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत देवीदास घोडके (माळशिरस) याने तुषार लिमडे (पुणे) याच्यावर एकचाक डावावर विजय मिळवून ७५ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. या कुस्तीला उपस्थित कुस्तीशौकिनांनी चांगलीच दाद दिली. तृतीय क्रमांकाची कुस्ती मयूर गु्रपच्यावतीने गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या स्मरणार्थ लावण्यात आली होती. मैदानात गौरी गोंदील व संजना बागडी (तुंग) या एकमेव महिलांच्या कुस्तीस शौकिनांनी टाळ्या वाजवून दाद दिली. अवघ्या आठव्या मिनिटात गौरीने संजनाला चितपट करून कुस्ती जिंकली.याशिवाय मैदानात हर्षवर्धन थोरात (सावळज), सागर काळेबाग (सांगली), अनिकेत गावडे (कुंडल), पृथ्वीराज कदम (बांबवडे), सौरभ सव्वाशे (मोराळे), समीर मुल्ला (दुधोंडी), चिकू मोरे (पलूस), नाथा पालवे (सांगली), किरण सिसाळ (पलूस), देवीदास घोडके (कोल्हापूर), वैभव कचरे, आदित्य गायकवाड, अनिकेत मोरे (सर्व पलूस), अवधूत पुदाले (येडेमच्छिंद्र), सूरज निकम (पलूस), निशांत जाधव (नागठाणे), ऋषिकेश जाधव (कुंडल), अमोल पवार (पलूस), अमोल नरळे (सांगली), इंद्रजित पाटील (आटके), अक्षय देशमुख (कुर्डूवाडी), रणजित निकम (पलूस), बाळू पुजारी (कोथळी), सचिन कदम (दुधोंडी), संजय जाधव (सांगली), संदीप काळे (पुणे), अशोक कुमार (हरियाणा) यांनी आकर्षक कुस्त्या केल्या.यावेळी लक्ष्मण पाटील, लालासाहेब पवार, मोहन पवार, पोलिस पाटील फिरोज मुल्ला, पोपट संकपाळ, पांडुरंग संकपाळ, ए. डी. पाटील, प्रकाश पाटील, ताहीर मुल्ला, बाबूराव संकपाळ, अनिल पवार, भानुदास पवार, विक्रम संपकाळ उपस्थित होते. शंकर पुजारी, ईश्वरा पाटील, ए. डी. पाटील, अभिजित कदम, लालासाहेब पवार यांनी निवेदन केले. मैदानास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, क्रांती उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण लाड, पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र लाड, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गोविंद पवार, कबड्डीपटू काशिलिंग आडके यांनी भेट दिली.बांबवडे (ता. पलूस) येथे सोमवारी झालेल्या कुस्ती मैदानात किरण भगत याने सेनादलाच्या सोनू याला चितपट केले. दुसऱ्या छायाचित्रात किरण भगत याला कुस्ती शौकिनांनी उचलून घेऊन जल्लोष केला.
भगतने मारले बांबवडेचे मैदान
By admin | Published: August 16, 2016 11:28 PM