कोपार्डे : भामटे (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान विश्वास देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भामटे ग्रामपंचायत सरपंचपद मागासवर्गीय महिला आरक्षण जाहीर झाले होते; पण या प्रवर्गातील एकही सदस्य विद्यमान सभागृहात नसल्याने सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले आहे. सरपंच, उपसरपंच झालेल्या निवडीच्या वेळी केवळ उपसरपंच निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकर यादव यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, काँग्रेसचे भगवान देसाई यांनी या गटाचे नेतृत्व केले होते. निवडीवेळी शिवाजी कांबळे, अक्षय पानारी, रेश्मा देसाई, रेखा मगदूम, प्रतीक्षा माळी, सुवर्णा पाटील, नामदेव देसाई, उत्तम देसाई, सुधाकर देसाई, मारुती देसाई, राजू देसाई उपस्थित होते.
(फोटो - भगवान देसाई)