शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...
2
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
3
ते पुन्हा आले! २०१९ चा 'घात' ते २०२४ ची 'लाट'; देवेंद्र फडणवीसांसाठी कसा होता ५ वर्षांचा प्रवास?
4
भारतानं UNGA मध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्‍या बाजूनं केलं मतदान! जाणून घ्या, 193 देशांची भूमिका काय?
5
महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला? अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
6
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच; खरेदीपूर्वी पाहा सोन्याचे लेटेस्ट दर
7
Vaibhav Suryavanshi च्या भात्यातून आली कडक फिफ्टी! लाँग सिक्सरसह दाखवली ताकद (VIDEO)
8
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
9
रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...
10
दत्त जयंती: इच्छा आहे, पण गुरुचरित्र पारायण शक्य नाही? ‘हे’ स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा
11
७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
12
महागाईत ग्राहकांना बसणार आणखी एक चटका! Swiggy वरून ऑर्डर करणे महागणार, 'हे' शुल्क वाढणार
13
'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; होमगार्डने पोलीस प्रशासनाला वेठीस धरले
14
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
15
साराचा नवा प्रवास! गोरगरिब लेकरांसाठी काम करत तेंडुलकर घराण्याची परंपरा जपण्याचा 'ध्यास'
16
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
17
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
18
Margashirsha Guruvar 2024: पहिल्यांदाच महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी पूजेची सविस्तर माहिती!
19
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

कॉपी इंग्रजीत, कारवाई हिंदीच्या विद्यार्थ्यांवर; शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकाची अजब कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 1:38 PM

कोल्हापूर : हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना राजाराम कॉलेज येथील परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्याच्या बेंचजवळ इंग्रजीतील कागद सापडला. मात्र, ...

कोल्हापूर : हिंदी विषयाचा पेपर सुरू असताना राजाराम कॉलेज येथील परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्याच्या बेंचजवळ इंग्रजीतील कागद सापडला. मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकाने इंग्रजीतील चिठ्ठी हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेला जोडून कॉपी सापडल्याची कारवाई विद्यार्थ्यावर केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या कारवाईला विद्यार्थ्यांसह पालकांनीही आक्षेप घेतला.सध्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. राजाराम कॉलेज येथील परीक्षा केंद्रामध्ये बी. एस्सी. केमिस्ट्री व बी. ए. भाग एकचा हिंदी विषयाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एकाच वर्गात केली होती. शुक्रवारी दुपारी साडेबाराला भरारी पथक केंद्रावर आले असता त्यांना काही विद्यार्थ्यांच्या आसनाजवळ कागद सापडले. पथकाने इंग्रजीतील चिठ्ठी हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेला जोडून कॉपी सापडल्याची कारवाई केली.मात्र, ही कारवाई अयोग्य असून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी पालकांनी केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केंद्रावर भेट देत वर्गांच्या स्वच्छतेच्या सूचना प्राचार्यांना दिल्या.

मी स्वत: या परीक्षा केंद्राला भेट दिली असून काही विद्यार्थ्यांजवळ कॉपी आढळून आली आहे. सत्यता पडताळून सदरचा विषय प्रमाद समितीपुढे ठेवला जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करणार आहे. - डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाShivaji Universityशिवाजी विद्यापीठ