कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हॉस्पिटल्स ॲन्ड नर्सिंग होम्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. भारत कोटकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. उदय पाटील, तर सचिवपदी डॉ. अभिजित तगारे यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली.
कोरोना काळामध्ये गतवर्षी प्रशासन आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये एक उत्तम समन्वयक म्हणून या संस्थेने काम केले होते. या कालावधीत संघटनेच्यावतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मावळते अध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. चारूहास भागवत यांनी या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. निरंजन शहा, डॉ. दीपक पाटील, डॉ. बाबर व अन्य कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते.
०५०४२०२१ कोल डॉ. भारत कोटकर
०५०४२०२१ कोल डॉ. अभिजित तगारे