कोल्हापूर : येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भारती अभ्यंकर या इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ कोलोस्कोपी अॅन्ड सर्व्हायकल पॅथॉलॉजी (आयएफसीएफसी) या अमेरिकेतील संस्थेतर्फे दिल्लीत घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात प्रथम आल्या.
‘कोलोस्कोपी’ या तंत्राद्वारे स्त्रीयांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या क र्करोगाचे निदान तो तपासण्यापूर्वीच करता येते. यामुळे पुढील कर्करोगाचे भयावह स्वरूप टाळता येऊ शकते. अविवाहित मुली अशा तपासण्या न करता एक लस टोचून घेऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला अटकाव करू शकतात.
अशा प्रकारचे लसीकरण कोल्हापुरातही प्रथमच डॉ. अभ्यंकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. डॉ. भारती अभ्यंकर गेली अनेक वर्षे व्याख्याने व शिबिराच्या माध्यमातून कर्करोग प्रतिबंधाचे कार्य करत आहेत. या यशाबद्दल त्यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला.