‘अवनि’तर्फे आरोग्य तपासणी
कोल्हापूर : अवनि स्थलांतरित विकास प्रकल्प आणि वीटभट्टी, साखरशाळा डे-केअर सेंटर उपक्रमांतर्गत वीटभट्टी आणि ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये कुडित्रे, कोपार्डे, वाकरे, खुपिरे, दोनवडे, जाधववाडी, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी येथील १६८ बालकांची आणि ७८ पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. श्रद्धा पाटील, शीतल पाटील, पद्मजा कांबळे, स्नेहल माळी यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले. साताप्पा मोहिते, अमर कांबळे, पुष्पा शिंदे, जयश्री कांबळे, मनीषा कांबळे, अंजली कांबळे यांनी शिबिराचे संयोजन केले.
‘रोटरॅक्ट क्लब’तर्फे सबला उपक्रम
कोल्हापूर : रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे श्रीराम हायस्कूल ज्युनिअर कॉलेज (कुडित्रे) आणि भागशाळा (कोपार्डे) येथे सबला हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये आठवी ते दहावीतील मुलींना मृणाल शिंदे, नूपुर पारेख, सुलता जैन, अस्मिता शहा, प्रियंका गोंडलिया यांनी मार्गदर्शन केले. एक हजार सॅनिटरी नॅपकीन बँकेचे प्रत्यार्पण करण्यात आले. या उपक्रमासाठी अमेय आसगावकर, मुख्याध्यापक बगाटे, उपमुख्याध्यापिका आशा पाटील, उपमुख्याध्यापक वाळके यांचे सहकार्य लाभले. यावेळी अभिजित पाटील, यश शहा, ऋषिकेश राजपूत, ध्रुव मोदी, श्रेयस पाटील उपस्थित होते. साहिल गांधी, यश मालगावे यांनी आभार मानले.
अण्णाभाऊ साठे बहुउद्देशिय संस्थेतर्फे आवाहन
कोल्हापूर : सांगली येथील लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशिय संस्थेतर्फे राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले आहे.