कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ६१ थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया अवसायक मंडळाने सुरू केली आहे. या थकबाकीदारांकडे सुमारे सात कोटींची येणे बाकी असून, ते वसुलीला अजिबात प्रतिसाद देत नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. ही लिलाव प्रक्रिया १२ ते २० जानेवारी दरम्यान केली जाणार आहे. भुदरगड पतसंस्थेच्या ठेवींचे वाटप न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. दहा हजारपर्यंतच्या ठेवींचे वाटप अंतिम टप्प्यात आहे. ठेवीदार पैशांसाठी पतसंस्थेचे उंबरे झिजवत असताना कर्जदार मात्र निवांत आहेत. अवसायक मंडळाने नेमलेल्या वसुली अधिकाऱ्यांनी वसुलीचा प्रयत्न केला; पण त्याला थोडाही प्रतिसाद या थकबाकीदारांनी दिला नाही. परिणामी, अवसायक मंडळाने संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. पतसंस्थेच्या गारगोटी शाखा क्रमांक १, गारगोटी शाखा क्रमांक २, आजरा व साईक्स एक्स्टेन्शन या चार शाखांकडील ६१ थकबाकीदारांच्या वसुलीसाठी मालमत्तेची लिलाव प्रक्र्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया १२ ते २० जानेवारीअखेर राबविली जाणार आहे. या ६१ थकबाकीदारांकडे तब्बल सात कोटींची थकबाकी असून, तिच्या वसुलीसाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. शाखानिहाय थकबाकीदारगारगोटी शाखा १ - २४गारगोटी शाखा २ - १४आजरा शाखा - ११साईक्स एक्स्टेन्शन शाखा - १२स्थावर मालमत्तासर्वच ६१ थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्ता तारण आहेत; त्यामुळे लिलावाला तरी कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
‘भुदरगड’ थकबाकीदारांच्या मालमत्तेचा होणार लिलाव
By admin | Published: December 13, 2014 12:37 AM