कोल्हापूर : आगामी भोगावती साखर कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी नेतृत्व करावे, असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी केले. भोगावती परिसरातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने कारखान्याचे ज्येष्ठ सभासद हरी चौगले (सोन्याची शिरोली) व गुडाळचे माजी सरपंच यशवंत पाटील यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांचा सत्कार कसबा बावडा येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी चरापले बोलत होते. अडचणीच्या काळात राधानगरीतील कॉँग्रेसच्या या मंडळींनी आपणाला चांगले सहकार्य केले असून, त्याचा विसर पडणार नाही, अशी ग्वाही देत आमदार सतेज पाटील म्हणाले, भोगावती साखर कारखान्यावर सध्या प्रशासक आहे. निवडणूक कधी लागेल हे माहिती नाही. तरीही आपण केलेली मदत खूप मोलाची असल्याने कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.यावेळी विजयसिंह मोरे, शामराव चौगले, ब्रह्मदेव चौगले, ज्ञानदेव पाटील, संजय पाटील, पंडित पाटील, एम. आर. गुरव, भाऊसो कवडे, आर. एस. पाटील, शिवाजी राबाडे, शिवाजी पाटील, सुभाष जाधव, बाळासो बरगे, विष्णुपंत चरापले, प्रा. प्रकाश ढेरे, राजू कारंडे, आदी उपस्थित होते. सतीश बरगे यांनी आभार मानले.
‘भोगावती’चे नेतृत्व सतेज पाटील यांनी करावे : चरापले
By admin | Published: March 29, 2016 12:56 AM