कुरुकली (ता. करवीर) येथील भाेगावती महाविद्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. यावेळी प्राचार्य दिनकर पाटील, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रा. एम. के. पाटील, प्रा. डी. एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. दिनकर पाटील म्हणाले, भाेगावती महाविद्यालयात २३ वर्षे शिक्षक म्हणून व बारा वर्षे प्राचार्य म्हणून केलेल्या कार्याचे मला मिळालेले समाधान हीच माझी कमाई आहे.
उपप्राचार्य आर. बी. हंकारे यांनी स्वागत केले. प्रभारी प्राचार्य आर. ए. सरनाेबत यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्रा. सुनील खराडे, प्रा. किरण पाटील, प्रा. डी. एस. पाटील, साै. कीर्ती कदम, नेताजी डाेंगळे यांची भाषणे झाली. या वेळी संस्थेचे संचालक सरदार पाटील, विलास पाटील, पी. बी. कवडे, शुभम पाटील, पी. एस. पाटील, शामराव काेईगडे, अनिल पाटील, प्रा. एस. के. परीट, अजिंक्य पाटील, उमेश मिसाळ आदी उपस्थित हाेते. अभिजित मेटील यांनी आभार मानले. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
फाेटाे ओळी :
कुरुकली : येथील भाेगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दिनकर पाटील, प्रा. एम. के. पाटील व प्रा. डी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना जयसिंगराव हुजरे, बंडाेपंत वाडकर, गोविंद चाैगले, सरदार पाटील, पी. बी. कवडे, पी. एस. पाटील.
(छायाचिञ: आर.के.फाेटाे पुंगाव.)