चंदगड : धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील भोगोली, पिळणी, हिंडगाव व कानडी तर ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेला असून भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जून महिन्याच्या तुलनेत जेवढा पाऊस पडला नाही त्यापेक्षा अधिक पाऊसाची नोंद जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात झाली आहे.
पिळणीच्या काहींना सुखरूप घरी पोहचविलेशनिवारी पावसाचा जोर अचानक वाढल्याने घटप्रभा नदीवरील पिळणी बंधारा पाण्याखाली गेला. त्यामुळे शाळा-काँलेज व कामासाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थी व काहींची अडचण झाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या सर्वांना सुखरूप घरी पोहचविले. रविवारपर्यंत जंगमहट्टी मध्यम प्रकल्पात ६२१.२० दलघमी, फाटकवाडी ७४२.३५ दलघमी तर ७३७.०० दलघमी पाण्याचा साठा आहे. जांबरे व फाटकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरूच असून नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोवाडमधील ३०० हून अधिक व्यापाऱ्यांना नोटिसाताम्रपर्णी नदीस संभाव्य पूराचा धोका ओळखून ३०० हून अधिक व्यापारी, १५० लोकांना याबाबतची नोटीसा प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या सूचनेने ग्रामपंचायतीने दिली आहे. तसेच, आवश्यक पडल्यास श्रीराम विद्यालय व आश्रम शाळेत स्थलांतरित लोकांची व्यवस्था केल्याचे मंडल अधिकारी शरद मगदूम यांनी सांगितले आहे.