शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

कोल्हापुरात भोंदूबाबाचा पर्दाफाश; करणी काढण्यासाठी ६५ हजारांची मागणी, तिघांना अटक

By उद्धव गोडसे | Published: October 28, 2023 7:03 PM

कोल्हापूर : नातेवाईकांनी करणी केल्याचे सांगून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये घेणा-या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ...

कोल्हापूर : नातेवाईकांनी करणी केल्याचे सांगून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये घेणा-या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने केले. शिवाजी पार्क येथील फ्रेंड्स कॉलनीत शनिवारी (दि. २८) दुपारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा पंडित विनायक शास्त्री याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवाजी पार्क येथील फ्रेंड्स कॉलनीत एका भोंदू बाबाकडून लोकांची फसवणूक होत असल्याची माहिती अंनिसच्या पदाधिका-यांना मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी अंनिसच्या सीमा पाटील या स्वत: शुक्रवारी (दि. २७) खोटी तक्रार घेऊन विनायक शास्त्री या भोंदू बाबाकडे गेल्या. 'कोरोना काळात पैशांची गरज होती, त्यामुळे दहा लाख रुपये हातउसने घेऊन मी माझ्या दिराला जमीन दिली होती. आता ते पैसे घेत नसून, जमिनीचा ताबा देण्यास टाळाटाळ करीत आहेत,' अशी तक्रार पाटील यांनी केली. यावर 'तुमच्या दिराने करणी केली असून, ती काढण्यासाठी ६५ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर दीर स्वत:हून येऊन तुम्हाला जमिनीचा ताबा देईल,' असे भोंदू बाबाने सांगितले.पाटील यांनी हा सर्व प्रकार पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कानावर घातला. शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने स्टिंग ऑपरेशनची तयारी करून शनिवारी दुपारी बोंदूबाबा विनायक शास्त्री याला ६० हजार रुपये घेताना पकडण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस