शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
3
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
4
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
5
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
6
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
7
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
8
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
9
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
10
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
11
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
12
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
13
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
14
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
15
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
16
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
17
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
18
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
20
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच

श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

By विश्वास पाटील | Published: February 10, 2024 1:17 PM

गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाला दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट

कोल्हापूर- गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, अभियंता अभिजित चौगुले, नूलच्या सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील,जयसिंगराव चव्हाण, गुरुकुल मधील शिष्यगण मुरगेंद्र हिरेमठ, ईश्वर स्वामी, गणेश जंगम, शिवानंद स्वामी, कार्तिक हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या भवनातून सर्वसामान्यांची मंगलकार्य व इतर कार्य संपन्न होणार आहेत. या भवनात सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र व सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्र असणार आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री सुरगीश्वर संस्थान मठाला भेट देऊन गुरु लिंगैक्य ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच श्री सुरगीश्वर मठाची पाहणी करुन मठाधिपती श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामिजींसोबत संवाद साधला. 

श्री सुरगीश्वर संस्थानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या श्रीसुरगीश्वर सांस्कृतिक भवनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचे काम घडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.  ग्रामस्थांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले. श्री सुरगीश्वर संस्थानच्या वतीने करण्यात येणारी सेंद्रिय शेती, गुरुकुल व सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर