सरवडे : मौजे कासारवाडा पैकी धनगरवाडा ( ता. राधानगरी ) येथे पिण्याच्या पाण्याची टाकी व पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीच्या सदस्या कल्पना मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी पं.स.सदस्य आर. के. मोरे म्हणाले, याठिकाणी निसर्ग उपजत पाणीसाठा आहे; परंतु साठवणुकीची समस्या होती, तो प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र, वन्यजीव प्राण्यांपासून होणारे नुकसान त्याचप्रमाणे पर्यटकांच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी शासन स्तरावर निश्चितच प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
यावेळी शासनाच्या १५ व्या वित आयोग पं.स.स्तरातून १ लाख ७० हजार रुपये खर्चाच्या या योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवाजी चौगले, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच जयवंत पाडळकर, माजी सरपंच गणेश पाटील, आण्णा थोरवत, गुंडाप्पा दिंडे, आबू कोळापटे, बाबू कोळापटे उपस्थित होते.