शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातून सायकल रॅली, आयुक्तांनी केला प्रबोधनाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 4:57 PM

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देप्लास्टिक मुक्तीसाठी शहरातून सायकल रॅलीरॅलीद्वारे मार्गदर्शन, ठिकठिकाणी कोपरा सभा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.रॅलीचा प्रारंभ महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते राजारामपुरी जनता बझार चौक येथून झाला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, ईश्वर परमार उपस्थित होते. कोल्हापूर ते दिल्ली सायकलवरून प्रवास केलेले आकाश गोपनूरकर व अनिकेत कांबळे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.रॅलीमध्ये सर्वांकडे ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’, ‘कापडी पिशवी, घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी’, ‘प्लास्टिकमध्ये नाही शान, मिटवून टाकू नामोनिशाण’, ‘प्लास्टिकचा वापर सोडा, पर्यावरणाशी नाते जोडा’, अशा घोषणा देऊन नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शहरातून ३५ किलोमीटर फिरून छ. शिवाजी मार्केट येथे दुपारी सव्वाबारा वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला.रॅलीदरम्यान जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी मार्के ट, कोळेकर तिकटी, निवृत्ती चौक, गंगावेश तालीम व शिवाजी मार्केट येथे कोपरा सभा घेऊन आयुक्त कलशेट्टी यांच्यासह मान्यवरांनी प्रबोधन केले. महापौर आजरेकर यांनी प्लास्टिकचा वापर बंद करून आपले शहर ३१ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त होण्याकरिता आवाहन केले. निवृत्ती चौक येथे कोपरा सभेमध्ये माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले यांनी प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी शिवाजी पेठेचा सहभाग राहील, अशी ग्वाही दिली. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन पर्यावरणमित्र अनिल चौगुले यांनी केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांच्यासह नेत्रदीप सरनोबत, संजय सरनाईक, सुभाष देसाई, रणजित चिले, हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, समीर वाघ्रांबरे, आर. के. पाटील, जयवंत पवार आदी अधिकारी तसेच उदय गायकवाड, अमित देशपांडे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर