शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

Kolhapur: ‘बिद्री’च्या राजकारणात ‘ए. वाय.’ना बेदखलची व्यूहरचना, सत्तारूढ गटांतर्गत खलबते 

By राजाराम लोंढे | Published: November 07, 2023 3:32 PM

अध्यक्षपदासह राधानगरीतील जागांवरून पेच

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना बेदखल करून पॅनेलची बांधणी करण्याचे सत्तारूढ गटांतर्गत खलबते सुरू आहेत. अध्यक्षपदासह राधानगरी तालुक्यातील सर्व गटातील उमेदवार निवडीवर पाटील यांनी दावा केल्याने हा पेच निर्माण झाला आहे.‘बिद्री’ कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्तारूढ व विरोधी आघाडीने पॅनेल बांधणीसाठी चाचपणी सुरू केली असून आघाडीच्या राजकारणात कोणत्या गटात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंदाज घेतला जात आहे. सत्तारूढ आघाडीने मागील निवडणुकीतील मित्रपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. पण, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ए. वाय. पाटील यांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे. मागील पाच वर्षात नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.आता ‘बिद्री’चे अध्यक्षपद व राधानगरी तालुक्यातील सर्व जागांवर आपण उमेदवार देणार अशी अट घातली आहे. पाटील यांच्या प्रस्तावाचे सत्तारूढ गटात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. पाटील यांच्या दबावाला झुकू नका, त्यांना घ्यायचा तो निर्णय घेऊ देत, असा दबाव कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केला आहे.रविवारी रात्री, के. पी. पाटील यांच्या घरी काही निवडक प्रमुखांची बैठक होऊन, ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेवर चर्चा झाली. ते सोडून गेले तर काय परिणाम होऊ शकतो? याचा अंदाजही घेण्यात आल्याचे समजते.

हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार

‘राधानगरी’च्या राजकारणात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यातील वाद नवा नाही. मात्र, प्रत्येक वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत दोघांना एकत्र ठेवण्यात यश मिळवले. आता ‘ए. वाय.’ना सत्तारूढ आघाडीतून बाहेर काढण्याची व्यूहरचना असली तरी त्याला मंत्री मुश्रीफ पाठबळ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दिवाळीनंतर पॅनेलची अंतिम बांधणी

या आठवड्यात सत्तारूढ व विरोधी आघाडीमध्ये उमेदवारीवरून चाचपणी होणार आहे. दिवाळीनंतर कोणत्या गटाला किती जागा, यावर चर्चा होऊन पॅनेलची घोषणा होणार आहे.१७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत‘बिद्री’साठी १७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. ३ डिसेंबरला मतदान तर ५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर