शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

कचऱ्याच्या समस्येचे मोठे आव्हान

By admin | Published: June 10, 2015 11:07 PM

कसई दोडामार्ग : स्वत:च्या घरापासूनच स्वच्छता करण्याची गरज--नगरपंचायतीला सामोरे जाताना

वैभव साळकर- दोडामार्ग  -कसई दोडामार्ग शहरासाठी कचऱ्याची समस्या नेहमीच मोठी डोकेदुखी ठरली आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नावर उपाययोजना आखण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु या प्रयत्नांमध्ये सातत्याचा अभाव राहिल्याने शहरासाठी कचरा समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. आता तर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्याने हा प्रश्न आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगर पंचायतीवर नव्याने निवडून येणाऱ्या नगर सेवकांसमोर दोडामार्गमधील कचऱ्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान उभे असणार आहे. २६ जून १९९९ रोजी अखंड असलेल्या सावंतवाडी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र अशा दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. पुढे दुसऱ्या दिवशी २७ जूनला त्यांच्याच हस्ते रितसर दोडामार्ग तालुक्याच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणून कसई दोडामार्ग गावाची निवड करण्यात आली. हळूहळू या गावात सर्वांच्याच प्रयत्नांनी विविध शासकीय कार्यालये आली. कर्मचारी वर्ग वाढला. परिणामत: लोकवस्ती देखील हळूहळू वाढू लागली. त्यामुळे गाव ही संकल्पना बाजूला सारून कसई दोडामार्गची वाटचाल शहराकरणाच्या दिशेने होऊ लागली. गेल्या पंधरा वर्षात शहराचा विस्तार बराच वाढला आणि लोकसंख्याही वाढली. परिणामी शहरात कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढले. दोडामार्ग बाजारपेठेचा विस्तार झाल्याने हॉटेल व्यवसाय आले. भाजीविक्रेते, मासे विक्रेत्यांची आणि इतर दुकानदारांची संख्या वाढली आणि हळूहळू कचऱ्याची समस्या आ-वासून पुढे आली. गेल्या दहा वर्षात शहरात वाढत चाललेली कचऱ्याची समस्या सद्यस्थितीचा विचार करता भविष्यात जटील रूप धारण करण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील भाजी विक्रेते, दुकानदार आदींसाठी कचऱ्याच्याबाबतीत कडक आचारसंहिता घालून न दिल्याने किंवा त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी न झाल्याने कचरा समस्या उग्र रूप धारण करू पाहत आहे. बाजारपेठेतील दुकानदार, भाजीविक्रेते आणि काही अंशी नागरिकांना देखील वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकण्याची सवय स्वत:च्या अंगी लावून घेतली आहे. हा प्रकार पुढे असाच सुरू राहिल्यास शहराला भकास रूप प्राप्त होईल. आतापर्यंत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा निर्मूलनासाठी अनेक उपाययोजना आखल्या. घराघरात छोट्या-छोट्या कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कचराकुंड्या उभारण्यात आल्या. मात्र, या उपाययोजनांमध्ये पुढे सातत्य राहिले नाही. जे भाजी विक्रेते वाटेल त्या ठिकाणी कचरा आणून टाकायचे. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात आला. काही काळ कारवाईच्या भीतीपोटी एका विशिष्ट ठिकाणी कचरा गोळा करून ठेवला जात होता. ग्रामपंचायतीचा कर्मचारी तो तेथून नेऊन टाकायचा. मात्र, त्यानंतर कारवाई थंडावल्याने पुन्हा पूर्वीसारखाच प्रकार सुरू आहे. कचरा वाटेल तिथे टाकला जात असल्याने शहरात काही ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणच्या सार्वजनिक कचराकुंड्या सध्या गायब आहेत. त्यामुळे कचरा नेऊन टाकावा तरी कोठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (उद्याच्या अंकात - वाहतुकीची कोंडी ठरते विकासातील अडसर)पोल्ट्री व्यावसायिकांना हवी आचारसंहिताशहरात चिकन सेंटर मोठ्या प्रमाणात आहेत. या चिकनसेंटरमधील कचरा आणून संबंधित व्यावसायिक भेडशी रस्त्यालगत आणून टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. यातून रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने अशा व्यावसायिकांना आचारसंहिता घालून देण्याची जबाबदारी निवडून येणाऱ्या नगरसेवकांवर राहणार आहे. स्वतंत्र कचरा डेपोची गरजदोडामार्ग शहरात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वप्रथम स्वतंत्र कचरा डेपोची व्यवस्था करणे अपरिहार्य आहे. मात्र, त्यासाठी वेगळी स्वतंत्र अशी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कचरा डेपोसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्याचे आव्हान नगर पंचायतीत बसणाऱ्या नगरसेवकांसमोर असणार आहे. कचरा समस्या होतेय जटीलही आहेत कचरा समस्येची कारणेकचरा कुंड्यांचा अभाव असल्यामुळे कचरा अवास्तव टाकला जातो.उपाययोजनांमध्ये सातत्याची कमीव्यावसायिकांनी आचारसंहिता नाहीकचना निर्मूलनासंदर्भात जनजागृती नाहीकचरा गोळा करण्यासाठी लागणाऱ्या जागेची अनुपलब्धता...या आहेत उपाययोजनाकचऱ्याच्या निर्मूलन व व्यवस्थापनांतर्गत लोकांमध्ये जागृती करणेसार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या उपलब्ध करणेसातत्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणेभाजी, हॉटेल व चिकन विक्रेत्यांना आचारसंहिता घालून देणेकचरा डेपोसाठी ठिकठिकाणी जागा उपलब्ध करणेकसई दोडामार्ग होणार नगरपंचायत...तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीना नगर पंचायतीत रुपांतरीत करण्याच्या तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने कसई-दोडामार्ग ग्रामपंचायत ही आता नगरपंचायत म्हणून संबोधली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा कारभार गतिमान होणार असल्याने शहरवासीयांना नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. नवी वार्डरचना, नवे नगरसेवक आदी विविध स्थित्यंतरे नव्याने निर्माण झालेल्या कसई दोडामार्ग नगर पंचायतीत होणार आहेत. आतापासूनच उमेदवारांची राजकीय पक्ष चाचपणी होत आहे. त्यामुळे अनेकजण भावी नगरसेवक म्हणून गुडघ्याला बाशिंक बांधून आले आहेत. मात्र, या नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना नगर पंचायतीत पाऊल ठेवताच अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचे, प्रश्नांचे निराकारण करण्याची जबाबदारी या नगरसेवकांवर राहणार आहे. काय आहेत या दोडामार्गच्या समस्या? कोणते प्रश्न इथल्या लोकांना नेहमी भेडसावताहेत? याचा वेध घेण्याचा प्रयत्न लोकमतच्या माध्यमातून नगर पंचायतीला सामोरे जाताना या वृत्त मालिकेतून आजपासून केला जातो आहे.