कोल्हापूर : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे. कुठल्याही प्रश्नाची तड लावण्याऐवजी त्याबाबत टोलवाटोलवी करण्याच्या सरकारच्या कामगिरीने देशात महागाई वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी रविवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी खुल्या अधिवेशनात ते म्हणाले, गोरगरिबांना जगणे अशक्य झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे कुटील कारस्थान सरकारच्या पाठिंब्याने काही संघटना करीत आहेत. ते रोखण्यासाठी भाजपा सरकारला सर्व पक्ष, संघटना, संस्थांनी एकमुखाने विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.अधिवेशनात ‘महात्मा गांधी काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात प्रा. सोमनाथ रोडे, एम. एस. पाटोळे, शिवाजीराव परुळेकर, प्रा. किसन कुराडे, सुरेश शिपूरकर यांनी सहभाग घेतला. गांधी विचारांची समाजव्यवस्थेला गरज असल्याची भूमिका त्यात मांडली.
‘भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:34 AM