शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ, दीड महिना आधीच दिवाळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 3:16 PM

पगारवाढीचा करार : हसन मुश्रीफ यांची कर्मचाऱ्यांना गोड भेट : ३७.५० कोटी फरकही मिळणार

कोल्हापूर : जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करार सोमवारी कामगार युनियनसोबत झाला असून, ८८ महिन्यांचा ३७ कोटी ५० लाख फरकही तीन टप्प्यांत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. बँकेच्या १२५० कर्मचाऱ्यांना दीड महिने अगोदरच अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवाळीची भेट दिल्याने कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील २०१५ ला बँकेच्या चाव्या संचालक मंडळाकडे आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत संचित तोटा कमी करून देशातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आणली. यामध्ये अध्यक्ष हसन मुश्रीफ, संचालक मंडळासोबतच कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. बँक सक्षम झाल्यानंतर पगारवाढीचा करार करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राजू आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, युनियनचे अतुल दिघे, बळी पाटील, भगवान पाटील, आनंदराव परुळेकर, आय. बी. मुन्शी, भगवान पाटील, नारायण मिरजकर, प्रकाश जाधव, दिलीप लोखंडे व संचालक उपस्थित होते.

असा मिळणार ३७ कोटी फरक..

  • कालावधी : १ एप्रिल २०१७ ते ३१ जुलै २०२४
  • रक्कम : ३७.५० काेटी
  • ऑक्टोबर २०२४ : १२.५० कोटी
  • ऑगस्ट २०२५ : १२.५० कोटी
  • ऑगस्ट २०२६ : १२.५० कोटी
  • ऑगस्ट २०२४ पासून अशी मिळणार पगारवाढ ...
  • आता सेवेत लागलेले अनुकंपा : दरमहा २०० ते ५०० रुपये
  • २०१८ ला सेवेत : ५०० ते ६०० रुपये
  • जुने कर्मचारी : १००० ते ४५०० रुपये

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही ‘प्रोत्साहन’एप्रिल २०११ ते मार्च २०१७ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे ६८५ कर्मचाऱ्यांना प्रति महिना १०० रुपये प्राेत्साहन म्हणून देण्यात येणार आहे.

नवीन भरतीतील कर्मचाऱ्यांना पगार कमीभरतीनंतर सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणीनुसार म्हणजेच जुन्या कर्मचाऱ्यांपेक्षा तीन ते चार हजाराने पगार कमी राहणार आहे.चार दावेही घेतले मागेकामगार युनियनने पदोन्नतीसह इतर चार दावे बँकेविरोधात दाखल केले होते. मात्र, त्यापैकी बहुतांशी गोष्टीची पूर्तता बँकेने केल्याने दावे मागे घेतले जाणार आहेत.

पुणे, सांगली, सातारा या जिल्हा बँकांचा अभ्यास करून ही पगार वाढ लागू केली. संचालकांनीही मोठ्या मनाने पगारवाढीला संमती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी बँक ही आपली माता आहे, या भावनेने काम करावे. ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून देऊन काम करा. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ