शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

एकच मिशन, जुनी पेन्शन; सरकारी कर्मचाऱ्यांची कोल्हापुरात भव्य बाईक रॅली

By समीर देशपांडे | Published: September 21, 2022 2:21 PM

‘एकच पेन्शन, जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.

कोल्हापूर : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी बाईक रॅली काढली. ‘एकच पेन्शन, जुनी पेन्शन’, ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.दसरा चौकातून रॅलीला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी दहापासूनच दसरा चौकामध्ये विविध सरकारी विभागातील कर्मचारी दाखल होण्यास सुरूवात झाली. अनेकांनी लाल टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर जुनी पेन्शन लिहले होते. लाल झेंडे, समोर रिक्षातून घोषणाबाजी करत कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.यावेळी जिल्हा शाखेचे सरचिटणीस अनिल लवेकर म्हणाले, २१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेत जुन्या पेन्शनसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ जानेवारी २०१९ रोजी या संदर्भात अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतू साडे तीन वर्षे झाली याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यापुढे जर याबाबत निर्णय झाला नाही तर काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही दिला.दरम्यान, जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, अनिल लवेकर, संजय क्षीरसागर, राजू गंधवाले, संजय खोत, सुनील देसाई, सतीश ढेकळे, अनिल खोत, संदीप नलवडे, आखिल शेख, धोंडिराम चव्हाण, जयदीप कांबळे, संतोष पांगम, गणेश आसगावकर, योगेश यादव, प्रकाश पाटील, रमेश भोसले, बी. एस. खोत, उदय लांबोरे, सुधाकर सावंत, उमेश देसाई यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तायक कवतिके यांच्याकडे निवेदन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन