शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

शिधापत्रिकांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य

By admin | Published: April 17, 2017 12:55 AM

इचलकरंजीतील २४४ दुकानांतून नवीन पद्धतीचा लाभ : धान्याच्या काळाबाजाराला आळा बसण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब

इचलकरंजी : शहरातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकांवर धान्य मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये सुमारे तीस हजार कुटुंबांना या नवीन पद्धतीचा लाभ मिळणार असून, शासनाच्या धोरणानुसार रेशनिंग दुकानातून होणाऱ्या धान्याच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीचा लाभ इचलकरंजी शहराबरोबरच ग्रामीण परिसरातील पाच गावांमध्ये असणाऱ्या २४४ सरकारमान्य धान्य दुकानांतून दिला जाणार आहे.इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योगाच्या शहरामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या कामगार कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. यातील बहुतांश कुटुंबीयांना अल्प मजुरी मिळत असल्यामुळे त्यांना सरकारमान्य धान्याच्या दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर अवलंबून राहावे लागते. शहरामध्ये एकूण ८४ हजार शिधापत्रिका असल्या तरी त्यापैकी दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका ११ हजार ४९४ व अंत्योदय शिधापत्रिका ४ हजार ८०५ आहेत. याशिवाय २५ हजार केसरी शिधापत्रिकांपैकी १४ हजार शिधापत्रिकांना प्राधान्यक्रमाने धान्य दिले जाते.एकूण मिळणाऱ्या शिधा पत्रिकांवरील धान्यांपैकी काही प्रमाणात धान्यांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्याच्या विरोधात शहरातील विविध कामगार संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.सरकारमान्य धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रमाने इचलकरंजी शहराचा समावेश व्हावा, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर प्रयत्नरत आहेत. त्याला आता यश येत असून, शहरात असलेल्या १०३ सरकारमान्य धान्य दुकानांतून बायोमेट्रिक यंत्रे बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या शिधापत्रिकांचे आधारकार्डाशी निगडित करण्याचे काम सुरू आहे. त्याचपाठोपाठ आता बायोमेट्रिक पद्धतीची यंत्रे सरकारमान्य दुकानात दाखल होण्यास सुरूवात होत आहे. याचबरोबर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अन्य पाच गावांमध्ये असलेल्या १४१ स्वस्त धान्यांच्या दुकानांत सुद्धा बायोमेट्रिक यंत्रे बसविली जाणार आहेत.धान्य मिळण्यासाठी लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकेवरील एका लाभार्थ्याला धान्य आणण्यासाठी संबंधित दुकानामध्ये जावे लागणार आहे. धान्य दुकानदाराकडून बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे ठसे उमटविल्यानंतरच संबंधित शिधापत्रिकेला धान्य मिळणार आहे. (प्रतिनिधी)