कोल्हापूर : पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सलीम अली व ज्येष्ठ अरण्यतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षप्रेमींतर्फे आयोजित केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त रविवारी आडी बेनाडी डोंगर पठार परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यात राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुहास वायंगणकर यांनी मार्गदर्शन केले.वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन (कोल्हापूर), वनमित्र संस्था कागल, हरित वारी ग्रुप बेनाडीतर्फे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शिकरा, पेटंट ग्रास ऑफर, बुलबुल, रातवा, कोमेट, मुनिया, कोतवाल, मोर, सुभंग, हरियाल, हळद्या, रंगीत कवडा, खाटीक पक्षी, गरुड, सातभाई, बोनालीस, किरिमीर ऑरेंज स्टफ अशा विविध जातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले.
या मोहिमेत अमोल बुड्डे, सतीश कोरडे, परितोष उरकुडे, अक्षय कांबळे, अशोक शिरोळे, अमोल चौगुले, राजेंद्र घोरपडे, लखन माळी, काशीनाथ गारगोटे, नारायण सुतार आदी सहभागी झाले होते.