धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कोथळी येथील श्री बिरदेवाची १९,२० रोजी होणारी त्रैवार्षिक जळयात्रा कोराेनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून माेजक्याच धनगर बांधव व मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची निर्णय देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत करण्यात आला असल्याची मााहिती सरपंच मंगल पाटील, उपसरपंच धीरज आमते, शरद पाटील यांनी दिली. कोथळी येथील बिरदेवाची जळ यात्रा तीन वर्षांनी मोठ्या प्रमाणात भरते. यावर्षी काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भाविकांनी नैवेद्य देण्यासाठी गदीॅ करू नये ग्रामपंचायत व समितीने ठरवून दिलेल्या माेजक्या पुजाऱ्यांच्यासमवेत विधी साेहळा पार पाडावा. पालखी व भाकणूक धामिॅक विधी माेजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून करून करण्यात येणार असून परगावच्या भाविकांना व माहेरवाशिणींना गावात प्रवेश नाकारण्यात येणार आला आहे.
कोथळी येथील बिरदेवाची आज होणारी त्रैवार्षिक जळयात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:21 AM