मराठा महासंघातर्फे साध्या पध्दतीने जयंती
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने कोरोनामुळे यावर्षी साध्या पध्दतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. याअंतर्गत राजर्षी शाहू लेखमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित केली जाणार आहे. तसेच अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
चौकट
विद्यापीठातर्फे डॉ. जयसिंगराव पवार यांचे व्याख्यान
शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू जयंतीनिमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे ‘राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कोरोनाच्या निकषांचे पालन सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर ‘शिव-वार्ता’ या यू ट्यूब वाहिनीवरुन डॉ. जयसिंगराव पवार यांचे व्याख्यान होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.