स्वातंत्र्यसेनानी माने यांचे चिरंजीव आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आनंद माने यांच्या निवासस्थानी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसेनानी माने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विविध माध्यमांमध्ये लेखांच्या माध्यमातून प्राचार्य विलास पवार, प्रा. डॉ. मंजूश्री घोरपडे, मधुकर पाटील आणि सुनीलकुमार सरनाईक यांनी स्वातंत्र्यसेनानी माने यांचा जीवनप्रवास आणि सामाजिक, राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला. त्याबद्दल या लेखकांचा ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, आशा सासने, दादा लाड, आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजीराव माने, वसंत पंदारकर, संजय काटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, ॲड. गुलाबराव घोरपडे, माजी महापौर आर. के. पोवार, उद्योगपती दिलीप मोहिते, अण्णासाहेब मोहिते, शिवाजी मोहिते, तेज घाटगे, प्रसाद कामत, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, जयेश ओसवाल, बाळासाहेब सासने, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रताप माने, भगवान काटे, रवींद्र साळोखे, आदी उपस्थित होते. नगरसेवक अर्जुन माने यांनी स्वागत केले.
फोटो (१५१२२०२०-कोल-शंकरराव माने (जन्मशताब्दी) : कोल्हापुरात मंगळवारी स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून तेज घाटगे, अर्जुन माने, आनंद माने, जयेश ओसवाल उपस्थित होते.