शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दूध दरासाठी कोल्हापुरात भाजपने रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 7:33 PM

दूध खरेदीच्या दरात वाढीच्या मागणीसाठी शनिवारी भाजप रयत क्रांती व मित्रपक्षांतर्फे कोल्हापुरात दुपारी पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांनी पंचगंगा पुलावर ठिय्या मारीत वाहतूक रोखली. यावेळी गोकुळचा दूध टँकर अडवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.

ठळक मुद्देधनंजय महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांना अटकगोकुळ टँकर अडवण्यावरून आंदोलकांची पोलिसांबरोबर झटापट

कोल्हापूर : दूध खरेदीच्या दरात वाढीच्या मागणीसाठी शनिवारी भाजप रयत क्रांती व मित्रपक्षांतर्फे कोल्हापुरात दुपारी पुणे-बंगलोर महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांनी पंचगंगा पुलावर ठिय्या मारीत वाहतूक रोखली. यावेळी गोकुळचा दूध टँकर अडवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.दुधाला प्रतिलिटर पाच रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी शनिवारी राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. कोल्हापुरातही या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला.तावडे हॉटेल येथे पंचगंगा पुलावर झालेल्या या आंदोलनावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, रिपाइंचे उत्तम कांबळे, शहाजी कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले.आंदोलन तीव्र करणारराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक दूध दर मिळायलाच हवा. तो मिळत नाही तोवर आंदोलन असेच तीव्र होत जाईल, असा इशारा धनंजय महाडिक यांनीपोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापटकोल्हापुरातील दूध दरवाढ आंदोलनात पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे ह्यगोकुळह्णचे दूध टँकर आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने गोंधळ उडाला. आंदोलनावेळी झालेल्या गर्दीत कोरोनाची धास्ती हरवून गेली. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला.मागण्या

  • म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढ मिळावी
  • गाईच्या दूधखरेदीला १० रुपये अनुदान द्यावे. दुधाला सरसकट ३० रुपये दर द्यावा.
  • दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे.

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाBJPभाजपाkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक