बेळगाव : काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचे, तर भाजप राष्ट्रीयत्वाचे दुकान चालवित असून त्यांच्याकडून आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका बेळगावात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी केल.काँग्रेस-भाजपला विसरा आणि जेडीएसला मत द्या, असा नारा त्यांनी दिला. बेळगावात भगवा फेटा परिधान करून त्यांनी भाषण दिले. सीपीएड् मैदान येथे सभा झाली.
बेळगाव उत्तरमधील उमेदवार अशफाक मडकी, शिवनगौडा पाटील या जनता दल (स.) उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. मी अनेक दिवसांपासून बेळगावला यायचा विचार करीत होतो; पण कर्नाटकातील काँग्रेस सरकार आडकाटी घालण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे हे शक्य होत नव्हते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मला बेळगावला येण्यापासून कायम रोखत होते; पण मी आता बेळगावला येतच राहणार. मला आता रोखणे काँग्रेसला शक्य होणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले.
राहुल गांधी म्हणत होते, संसदेत १५ मिनिटे बोलायला संधी द्या. आता त्याच राहुल गांधींना मी विचारतो की, मला बेळगावला येण्यास का रोखत होता. मोदी आणि राहुल गांधी यांनी माझ्याबरोबर खुल्या चर्चेला यावे. फक्त पाच मिनिटे चर्चा करा, असे खुले आव्हान मी देतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ओवैसी कर्नाटकात मत विभाजन करायला आले आहेत, असे लोक म्हणत आहेत. मुस्लिम, दलित सर्वसामान्य वर्गाच्या राजकीय सबलीकरणासाठी काँग्रेस, भाजप बाधा घालत आहेत.
मी कोणत्याही जाती-धर्माच्या बाजूने नाही. माझे आंदोलन प्रत्येकाला घटनेने दिलेले अधिकार मिळावेत यासाठी आहे. कर्नाटकात दिवसेंदिवस गुन्हे आणि संशयास्पद मृत्यू वाढताहेत. काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली आहे. मोदींना गुजरातला परत पाठविण्याचे धाडस फक्त प्रादेशिक पक्षातच आहे.आझाद यांचा ओवैसींवर पलटवारबेळगाव : असादुद्दीन ओवैेसी हे कोणत्या दुकानदारातून जन्माला आले आहेत, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाबनबी आझाद यांनी ओवैेसी यांच्यावर पलटवार केला आहे. मंगळवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप राष्ट्रीयत्वाचे तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेची दुकानदारी चालविली असल्याची टीका ओवैेसी यांनी केली होती. निवडणुकीत दिलेली कोणतीच आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. संसदेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी बाहेर काँग्रेस विरोधी वक्तव्ये करीत आहेत. असे ते म्हणाले.