लोकमत न्यूज नेटवर्कसावरवाडी : केंद्रातील मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करून भूलथापा मारून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा कुटील डाव करीत आहे. नोटाबंदी, काळा पैसा व शेतकºयांची कर्जमाफी यामुळे सामान्य जनता हैराण झाली असून, शेतकºयांच्या विकासाऐवजी शेतकरीविरोधी धोरणे राबविणारे केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्याची टीका कॉँग्रेस पक्षाचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कै. शिवाजीराव कृष्णा पाटील युवक मंडळ व तुळशी सहकार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील होते.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात मी गेली २५ वर्षे कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळाबरोबरच युवाशक्तीला जनताभिमुख विचारांची शिकवण देणे गरजेचे असल्याचे सांगून आ. सतेज पाटील आपल्या भाषणात म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीत शेतकरी, युवक, सुशिक्षित युवकांना विकासापासून वंचित ठेवले जाते. बेरोजगाराचे प्रश्न वाढत आहेत.
नोकºया मिळत नाही, गेल्या तीनवर्षांत केवळ खोटी आश्वासनेदिली. शेतकºयांचा सातबारा बदलला. जवानांची हत्या होत आहे. याबाबत केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढताहेत. नव्या परिवर्तनाची ग्रामीण भागात कॉँग्रेस पक्षाची नव्या उभारणी करण्यासाठी युवा शक्तीची खरी गरज आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक बाबासाहेब चौगले,करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
युवा कॉँग्रेसचे चेतन पाटील, यशवंत बॅँकेचे संचालकसरदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, मनोहर भोपळे, सर्जेराव पाटील,डी. वाय. पाटील, धुळोबा पाटील, संजय कदम, संदीप पवार, राम सारंग,नितीन पाटील, राजू शिरगांवकर, पांडुरंग पाटील, राऊ पाटील (वाकरेकर), आदी उपस्थित होते. प्रारंभी उपसरपंच सरदार पाटील यांनी प्रास्ताविक केले. मयूर घोरपडे यांनी आभार मानले.