चंदगड : भाजपाचेचंदगडविधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील तुतीरी हाती घेणार असल्याचे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, यावर शिवाजी पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना स्पष्टीकरण दिले.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या अनेक सर्व्हेमध्ये मी अव्वलस्थानी असल्याने मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासह अनेकांनी ऑफर दिली. मी निवडणुकीसाठी इच्छुक असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. मी आशावादी असल्याने सध्या तरी कोणत्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना दिले.हे ही वाचा - दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यतागेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून पक्षाचे काम जोमाने सुरू केले. यामुळे जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मला विचारणा झाली हे खरं आहे. पण माझ्याबाबतीत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील याची खात्री असल्याने कुठल्याही पक्षाची ऑफर स्वीकारणार नसल्याचा निर्वाळा पाटील यांनी दिला.