कृष्णा सावंत।आजरा : आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती होत आहेत. भाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सर्वच प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने त्याचा कुणाला फायदा, कुणाला फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी-काँगे्रस व शिवसेनेचे संभाजी पाटील गट यांची आघाडी आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन टोपले, दयानंद भुसारी व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय थोरवत यांची परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे.चराटी यांनी भाजपऐवजी ताराराणी आघाडी रिंगणात उतरविली आहे. मात्र, भाजपचे जुने कार्यकर्ते व माजी सरपंच जनार्दन टोपले यांच्या पत्नी स्मिता टोपले आणि दयानंद भुसारी यांच्या पत्नी माजी सरपंच नयन भुसारी, तर चराटी यांचे निकटवर्ती दिनेश कुरूणकर यांनी बंडखोरी केली आहे.
ताराराणी आघाडीतर्फे चराटी यांच्या कन्या ज्योत्स्ना पाटील-चराटी या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासमोर परिवर्तन आघाडीच्या स्मिता टोपले आणि राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीच्या अलका शिंपी यांचे आव्हान आहे. प्रभाग ११ मधून नगरसेवकपदासाठी स्वत: चराटी रिंगणात उतरले आहेत. त्यांचे निकटवर्तीय दिनेश कुरूणकर यांनी त्यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.राष्ट्रवादी व काँगे्रसची आघाडी एकसंघ वाटत असतानाच राष्ट्रवादी आघाडीचे प्रमुख व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचे चिरंजीव विक्रमसिंह देसाई आणि त्यांचे निकटवर्तीय वाय. बी. चव्हाण यांच्या पत्नी सुमन यशवंत चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे.
राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीने प्रभाग दोनमधून शिवसेनेच्या संभाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई यांचे चिरंजीव विक्रमसिंह देसाई यांनीच बंडखोरी केल्याने या आघाडीसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.प्रभाग ११ मध्ये अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख व माजी सरपंच अशोक चराटी, माजी सरपंच जनार्दन टोपले, जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिनेश कुरूणकर, जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी यांचे समर्थक अमित महाडिक यांच्यात चौरंगी सामना होत आहे. येथील लढतीकडे आजऱ्यासह जिल्ह्याचे लक्ष आहे.नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढतीआजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढतीभाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागलेसर्वच प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने त्याचा कुणाला फायदा.. कुणाला फटका..भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी४राष्ट्रवादी-काँगे्रस व शिवसेनेचे संभाजी पाटील गट यांची आघाडी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन टोपले, दयानंद भुसारी व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय थोरवत यांची परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत