जयसिंगपूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने ही जागा मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सरु केली आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटगाठीही सुरु झाल्या आहेत.कोल्हापूर उत्तरमधून भाजपाला पाठींबा द्यावा, यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बंद खोलीत सुमारे अर्धा तास कोल्हापूर उत्तर पाठींब्यासह महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपला पाठींबा देण्यासह विविध विषयावर चर्चा झाली.दरम्यान, कोल्हापूर येथे ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थापन झाली असताना शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रात राजकीय टोळीयुध्द सुरु असल्याची टिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी केली.
'उत्तर' पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 5:51 PM