कोल्हापूर भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर ‘शिवगान’ २०२१ या गायन स्पर्धेचे आयोजन केले. १२ वर्षांपुढील गायकांसाठी खुली असलेली ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. वैयक्तिक व सांघिक गीत प्रकारामध्ये स्पर्धा होणार असून प्राथमिक फेरी दि. ९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये व अंतिम फेरी शिवजयंती दिवशी दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सातारा येथे अजिंक्यतारा किल्ल्यावर होणार आहे. मराठी, हिंदी, संस्कृत भाषेमध्ये गीत सादर करता येणार आहे.
स्पर्धक छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्ती गीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग सादर करू शकतात. प्राथमिक फेरीसाठी वैयक्तिक स्पर्धेतील विजेत्यांना ७, ५ आणि ३ हजारांची बक्षिसे आहेत. तर सांघिकसाठी ११, ७५०० व ५१०० रुपये अशी बक्षिसे आहेत. अधिक माहितीसाठी भाजप कला व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक शैलेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा आणि बिंदू चौक सबजेलजवळील भाजप कार्यालयात नावे नोंदवावीत असे आवाहन भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.