कोल्हापूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघांतून लढण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. परंतु राज्यात महायुती झाली असल्याने जागा वाटपाचा जो काही निर्णय होईल, तो आघाडीधर्म म्हणून पाळला जाईल, असे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यात भाजने विधानसभेच्या किती जागा मागितल्या आहेत, असे विचारले असता महाडिक म्हणाले की, आमची तयारी दहाही जागा लढविण्याची आहे. मात्र, राज्यात महायुती झाली असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. कोणाला किती जागा मिळतील हे लवकरच कळेल. आम्ही जागा वाटप आणि उमेदवारांची नावे लवकर जाहीर करावीत असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला आहे.केंद्र व राज्य सरकारने अतिशय चांगले काम केल्यानंतरही लोकसभेला जागा कमी मिळाल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने खोटा नॅरेटिव्ह तयार केला. संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो, खोटा प्रचार करण्यात काँग्रेसची मंडळी यशस्वी झाली, असे महाडिक यांनी सांगितले.लवकरच १०० ई बसेस मिळणारकोल्हापूर शहरासाठी लवकरच १०० ई बसेस मिळतील असे खा. महाडिक यांनी सांगितले. बुद्धगार्डन येथील सिव्हिल वर्क तसेच पुईखडी ते बुद्ध गार्डन एचटी लाइन टाकण्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. आचारसंहितेमुळे त्यावर निर्णय झाला नव्हता. तो आता होईल. ही दोन कामे पूर्ण झाली की पुढील एक महिन्यात या १०० ई बसेस कोल्हापूर शहराला मिळतील, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा लढण्याची भाजपची तयारी, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 3:56 PM