शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

भाजप-शिवसेना युतीला जिल्ह्यात सुरुंग

By admin | Published: October 29, 2016 12:10 AM

नगरपालिका निवडणूक : भाजपची वेगवेगळी भूमिका; ‘जनसुराज्य‘ला प्राधान्य

कोल्हापूर : नगरपालिकांसाठी भाजप-शिवसेना युती असेल, या घोषणेला २४ तास उलटण्याआधीच कोल्हापूर जिल्ह्यात या युतीला सुरूंग लागल्याचे चित्र समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या ‘जनसुराज्य’ला प्राधान्य देत शिवसेनेला अनेक ठिकाणी भाजपने कट्ट्यावर बसविले आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईत घाईगडबडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी युतीची घोषणा केली होती; परंतु शुक्रवारी संध्याकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात जे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे, त्यातून त्यांनी दोन-तीन ठिकाणीच भाजप शिवसेनेसोबत असेल, असे संकेत दिले आहेत. कुरुंदवाडला रामचंद्र डांगे भाजपमध्ये आले आहेत. तेच तेथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे तेथे आता भाजप स्वबळावर लढणार आहे. मलकापूरला भाजपचे कार्यकर्ते आहेत; परंतु त्यांचा एकही नगरसेवक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे तेथेही जनसुराज्य-भाजप युती होण्याची शक्यता असून, तेथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. वडगाव आणि पन्हाळा येथे भाजपने ‘जनसुराज्य’शी युतीचा निर्णय जाहीर केला आहे. जयसिंगपूर येथे महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत आणि इचलकरंजी येथील आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सर्वपक्षीय आघाडीत भाजपचा समावेश असेल, तर कागल आणि मुरगूड येथील सर्वाधिकार नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेले शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना म्हणून नव्हे, तर मंडलिक गट म्हणून ही युती होऊ शकते. गडहिंग्लजबाबत चर्चा सुरूच आहे. तेथील निर्णय अजूनही झालेला नाही. भाजपने ज्या-त्या भागातील ताकदवान पक्षाबरोबर युतीचा निर्णय घेत अधिकाधिक ठिकाणी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.