शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 5:04 PM

जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने दबदबा कायम राखला असला तरी तडजोडीच्या भूमिकेने त्यांचे नुकसान झाले

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘कोल्हापूर’,’ गडहिंग्लज’, ‘जयसिंगपूर’ बाजार समित्यांच्या निवडणुकीत जिल्ह्यात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने दबदबा कायम राखला असला तरी तडजोडीच्या भूमिकेने त्यांचे नुकसान झाले आहे. भाजप-शिवसेनेने (शिंदे गट) चांगलीच मुसंडी मारली आहे. तिन्ही समित्यांमधील ५४ पैकी महायुतीची तब्बल २२ सदस्य संख्या झाल्याने सहकारी संस्थांमध्येही त्यांनी पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजप, काॅंग्रेस, शिवसेना (दोन्ही गट), जनता दल असे अर्धा डझन पक्ष कार्यरत होते. तरीही बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करत सर्वच नेत्यांनी सयंमाची भूमिका घेतली.या बाजार समितीचे गडहिंग्लज, चंदगड, आजरा व कागल (अर्धा) असे साडे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. विकास संस्थांच्या पातळीवर चारही तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. तरीही समझोत्याच्या राजकारणात विकास संस्था व ग्रामपंचायत गटात केवळ चार जागा मिळाल्या. येथे भाजपला ६ तर काॅंग्रेसला तीन जागा मिळाल्या. हमाल-तोलाईदार व व्यापारी गटातील दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने त्यांची संख्या सहापर्यंत पोहोचते.जयसिंगपूर बाजार समितीत बिनविरोधचा प्रयत्न फसला तरी सर्वपक्षीय मोट बांधली होती. भाजपच्या एका गटाने दंड थोपटल्याने झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सात, काॅंग्रेसला पाच, स्वाभिमानी व शिवसेना (ठाकरे गट), भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.कोल्हापूर बाजार समिती येथे राजकीय सोयीसाठी झालेल्या आघाडीविरोधात भाजप, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुड, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राहुल देसाई यांनी झुंज दिली. विरोधकांना अपेक्षित यश मिळालेले नसले तरी संस्थात्मक ताकद नसतानाही त्यांनी घेतलेली मते आत्मचिंतन करायला लावणारी आहेत.

समझोत्याचे राजकारणसार्वत्रिक निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी ‘कोल्हापूर’, ‘जयसिंगपूर’ व ‘गडहिंग्लज’ बाजार समित्यांच्या निवडणुकीत समझोत्याचे राजकारण केले. राज्यातील अस्थिर परिस्थितीमुळे कोण कोणाला अंगावर घेण्यास तयार नसल्याने प्रत्येकाने सावध भूमिका घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस