शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

साप-साप म्हणत भुई थोपटण्याचा कावेबाजपणा भाजपने बंद करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:26 AM

म्हाकवे : सेनापती संताजी घोरपडे कारखाना उभारणी करताना स्व. सदाशिवराव मंडलिक आणि मुश्रीफ यांचे हाडवैर ...

म्हाकवे : सेनापती संताजी घोरपडे कारखाना उभारणी करताना स्व. सदाशिवराव मंडलिक आणि मुश्रीफ यांचे हाडवैर सुरू होते. त्यामुळे या कारखान्यात गैरप्रकार असता तर मंडलिकांनीच विरोध केला असता. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते किरीट सोमय्यांकरवी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. साप-साप म्हणून भुई धोपटण्याची भाजपची ही रणनीती आहे. प्रत्येक गोष्टीला घोटाळेच म्हणायचे, मग तुमचे घोटाळे कोठे गेले, असा पलटवार करीत खासदार संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांची पाठराखण केली

आणूर (ता.कागल) येथील पेयजल योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. किरीट सोमय्या यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर मुश्रीफ व खासदार मंडलिक यांच्यामध्ये अंतर येणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येणार काय, आले तर काय वक्तव्य करणार, याबाबत उत्सुकता होती. मुश्रीफ हे विकासपुरुष असल्याचे सांगत मंडलिक यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक करीत सुरू असणाऱ्या अनेक चर्चांना पूर्णविरामच दिला. सातत्याने जनमाणसाची सेवा करणाऱ्या मुश्रीफांसारख्या व्यक्तीवर विनाकारण शिंतोडे उडवू नयेत. तुमचा हा कावेबाजपणा कोल्हापूरची शाहूप्रेमी जनता कदापि खपवून घेणार नाही.

दोन संजय आणि आम्ही एकसंधच

मुश्रीफ स्व. मंडलिकसाहेब यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे विकासाचे कार्य सुरू आहे; परंतु सोशल मीडियावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यामागे काही विघ्नसंतोषींची कारस्थाने आहेत; परंतु खासदार संजय मंडलिक, संजयबाबा घाटगे व आपण एकत्रच आहोत, असा जाहीर खुलासाही मुश्रीफ यांनी केला.

सुसाट गाडी रोखण्यासाठी खोटे आरोप : मुश्रीफ

गडहिंग्लज कारखान्याच्या मोठ्या अडचणी असतानाही ब्रिक्स कंपनीने आपल्या विनंतीवरून कारखाना चालविण्यास घेतला. त्यांना ८० कोटींहून अधिक तोटाच झाला. मी सातत्याने भाजपवर टीका करीत गेलो. माझी असणारी सुसाट गाडी रोखण्यासाठी खोटे आरोप करण्याचा भाजपचा डाव असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

मैत्रत्वात खोट आणत नाही : मंडलिक मुश्रीफ आणि आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. काही सोशल मीडियातज्ज्ञ नको ते फोटो व्हायरल करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु आम्ही मैत्री करताना मागे एक आणि पुढे एक असे करीत नाही. जे असेल ते समोरासमोर असते, असा खुलासा करीत खासदार मंडलिक यांनी कागल आणि जिल्ह्यातील आपली महाआघाडी अभेद्य असल्याचेही स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, वर्षाला २०० जणांनाच सभासद करता येते. मात्र, शेतकऱ्यांनी संताजी कारखाना लवकर व्हावा यासाठी आपली आवश्यक कागदपत्रे देऊन मोठ्या प्रमाणात शेअर्स घेतले. त्यामुळे बिचाऱ्या सामान्य माणसांचे सभासदत्व रद्द होईल या भीतीपोटी बोलत नसल्याचे मुश्रीफांनी थोडे नाराज होतच सांगितले. मात्र, यावेळी मंडलिकांनी त्यांना रोखत तुम्ही त्यांना काहीही खुलासा करू नका, त्यांना काय करायचे ते करू द्या, असे म्हणत धीर दिला.

कॅप्शन

आणूर येथील सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करताना हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक.